Product Details
स्वामी विवेकानंदांनी विभिन्न ठिकाणी घेतलेल्या वर्गांतील भाषणांच्या टिपणांचा तसेच त्यांच्या काही व्याख्यानांच्या टिपणांचा आणि अहवालांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केला आहे. स्वामी विवेकानंदांच्या दिव्य प्रतिभेचा विलास या भाषणांमधून आणि व्याख्यानांमधून पाहावयास सापडतो. त्यांनी केवळ धर्म, संस्कृती वा तत्त्वज्ञान या विषयांवरच व्याख्याने दिली नाहीत, तर भाषा, कला, संगीत, अन्न, पौर्वात्य स्त्रिया, भारत, भारतातील लोक इत्यादींसारख्या विविध विषयांवरही ते बोलले. अमेरिका व इंग्लंड या देशांमधील लोकांना त्यांनी आपल्या वर्गांतून व व्याख्यानांतून वेदान्ताची, भारतीय संस्कृतीची आणि हिंदुधर्मांत सांगितलेल्या विभिन्न साधनाप्रणालींची ओळख करून दिली. त्यामुळे हिंदुधर्माविषयी आणि भारतीयांविषयी पाश्चिमात्यांचे जे अनेक गैरसमज होते ते दूर झाले आणि त्यांना भारतीय धर्माविषयी आणि भारतीय संस्कृतीविषयी आकर्षण वाटू लागले. वैयक्तिक व सामूहिक जीवन योग्य रीतीने घडविण्यासाठी प्रस्तुत पुस्तकापासून उचित मार्गदर्शन लाभेल असा आम्हाला विश्वास वाटतो.