Rs.70.00
Author
Srimad Shankaracharya Pages
255 Choose Quantity
Product Details
हे उपनिषद कृष्ण यजुर्वेदीय कठ शाखेच्या अंतर्गत येते. सर्वच लोकांना मृत्यूच्या रहस्याविषयी जिज्ञासा आहे. माणूस मेल्यावर त्याचे काय होते? केवळ आत्मज्ञानी ऋषींनी मृत्यूच्या रहस्याचा उलगडा केला आहे. हे उपनिषद अतिशय काव्यमय आणि महत्त्वाचे शास्त्र आहे. यात प्रत्यक्ष मृत्युदेवता यमराज आणि आत्मज्ञानाची उत्कट तळमळ असलेला बालक नचिकेता यांच्यामधील संवादामधून मानवजीवनाचे परमोद्दिष्ट असलेले आत्मज्ञान विशद केले आहे. श्रेय आणि प्रेय, विद्या आणि अविद्या, सार आणि असार अशा विरोधी तत्त्वांचे आपल्या विवेकशक्तीने जो मनुष्य विश्लेषण करून आपल्या जीवनात केवळ श्रेयस्कर, सारात्सार अध्यात्मविद्येची कास धरतो तोच सर्व बंधनांपासून सुटून मुक्त होतो. कठोपनिषद हे आख्यायिकास्वरूप शास्त्र आहे. परंतु त्यातील ज्ञानामृत सर्व साधकांसाठी चिरस्थायी आनंदाचा स्रोत आहे.