Rs.10.00
Delivery
Author
Swami Vivekananda Pages
23 Translator
R R Deshapande Choose Quantity
Product Details
स्वामी विवेकानंदकृत ‘पुनर्जन्म आणि आत्म्याचे अमरत्व’ हे आमचे नवीन प्रकाशन प्रसिद्ध करताना आम्हाला आनंद होत आहे. स्वामी विवेकानंदांच्या मूळ इंग्रजी लेखांचा हा अनुवाद आहे. या पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी आत्म्याच्या अमरत्वाच्या सिद्धान्तावर प्रकाश पाडला असून जीवांच्या पुनर्जन्मासंबंधी हिंदुधर्माचे काय मत आहे आणि या बाबतीत पाश्चात्त्य विद्वानांचे काय म्हणणे आहे याचे सुंदर विवेचन केले आहे. आपल्या धर्मशास्त्रांतील पुनर्जन्मवाद हा कसा तर्कसंगत आहे व त्याच्या आधारे माणसाच्या या जन्मातील विविध प्रकारच्या प्रवृत्तींचे कसे स्पष्टीकरण करता येते हे देखील स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात बुद्धीला पटेल अशा भाषेत विशद करून सांगितले आहे. माणसाला आपल्या जीवनाचा विकास करून घेण्यास पुनर्जन्माचा सिद्धान्त साहाय्यभूत ठरतो हे स्वामीजींनी प्रस्तुत पुस्तकात स्पष्ट केले आहे.