Product Details
आधुनिक भारताच्या संदर्भात म्हणजेच आधुनिक भारतासमोर ज्या समस्या उभ्या आहेत त्यांच्या संदर्भात श्रीरामकृष्ण-विवेकानंदानी जे अमोघ मार्गदर्शन केले आणि या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जे उपाय दर्शविले त्यांचे मूलग्राही व सविस्तर विवेचन प्रस्तुत पुस्तकात केले आहे. आधुनिक विज्ञान, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, बुद्धिवाद, भोगवाद इत्यादींच्या संबंधात अनेक प्रकारच्या जटिल समस्या आधुनिक भारतासमोर उभ्या आहेत. प्राचीन भारतात ज्या समस्या होत्या त्यांहून या समस्या वेगळ्या स्वरूपाच्या असल्यामुळे त्यांना अनुरूप अशी उत्तरे आज अपेक्षित आहेत. ही उत्तरे श्रीरामकृष्ण-विवेकानंदांनी दिली आणि या समस्या सोडविण्याचे युगोपयोगी उपायही त्यांनी सांगितले. अशा प्रकारे त्यांनी आधुनिक भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक पतनापासून रक्षण केले.