Rs.90.00
Author
Pravrajika Aatmaprana Pages
354 Translator
Dr. Sharyu Bala Choose Quantity
Product Details
भगिनी निवेदिता हे नाव प्राप्त झाले ती मूळची आयरिश कन्या कु. मार्गारेट एलिझाबेद नोबल्, इ. स.1898 त भारतात आली. भारत हीच आपली मातृभूमी मानून तिने आपले उर्वरित जीवन येथे व्यतीत केले; आणि इ. स. 1911 त तिचा पार्थिव देह येथेच विसावला. निवेदितेच्या मृत्युसमयी अनेकांनी तिला अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आजपर्यंत हे कर्तव्य आम्ही पार पाडू शकलो नाही. भगिनी निवेदितेची इंग्रजी व बंगाली भाषेत लिहिलेली काही चरित्रे नुकतीच प्रसिद्ध झाली आहेत, परंतु ऐतिहासिक तपशिलाच्या दृष्टीने त्यांत बर्याच उणीवा राहिल्या आहेत. या जाणिवेने, निवेदितांच्या कन्याशाळेच्या सुवर्णमहोत्सवप्रसंगी, म्हणजेच इ. स. 1952 मध्ये, त्यांचे एक साधार चरित्र इंग्रजी व बंगाली या भाषांमधून प्रसिद्ध करावे असे श्री रामकृष्ण मिशनने ठरविले. बंगाली भाषेतील चरित्र श्री शारदा मठाच्या, प्रव्राजिका मुक्तिप्राणा यांनी लिहून ते इ. स. 1959 साली प्रसिद्ध केले. या ग्रंथाची आधारभूत सामुग्री प्रामुख्याने निवेदितांच्या ग्रंथांतूनच मिळते. पत्रे, दैनंदिनी व त्यांच्या अनेक सुप्रसिद्ध समकालीनांनी दिलेलेल उल्लेख यांचाही उपयोग होतो. निवेदितांबरोबर ज्यांनी काही कार्य केले आहे अशा व्यक्तींच्या व त्यांच्या काही विद्यार्थिनींच्या भेटी घेण्याचा प्रयत्नही लेखिकेने केला आहे. या अभ्यासपूर्ण चरित्र-ग्रंथाचे स्वागत बंगाली जनतेने फार उत्साहाने केले. प्रस्तुत इंग्रजी ग्रंथ हा जरी निवेदितांच्या बंगाली भाषेतील चरित्राचा अनुवाद नसला तरी सर्वसामान्य मांडणी त्यावरूनच केली आहे.