Rs.15.00
Author
Swami Shivatattwananda Pages
44 Choose Quantity
Product Details
मुंडक उपनिषद हे एक महत्त्वाचे उपनिषद असून त्यात जीवनविषयक सर्वोच्च सत्यांचे दिग्दर्शन काव्यमय व मधुर भाषेत केले आहे. अंगिरस आणि शौनक यांचा संवाद प्रस्तुत उपनिषदात वर्णिला असून अंगिरसांनी शौनकांना परा विद्येचे स्वरूप व मर्म विशद करून सांगितले आहे. आत्मज्ञान हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य असून परा विद्या ही आत-बाहेर सर्वत्र विलसत असलेल्या त्या परमात्म्याची प्रत्यक्ष अनुभूती करून घेण्यास साहाय्य करते आणि ही आत्मानुभूती झाली म्हणजे हृदयातील सारी कुटिलता नाहीशी होते, अज्ञानाचा पूर्णपणे नाश होतो व सर्व संशय नष्ट होतात. मानवजीवनाची परिपूर्णता याच अनुभूतीत आहे. ज्या सिद्ध व्यक्ती या अनुभूतीत प्रतिष्ठित झाल्या आहेत त्यांना या उपनिषदाने ‘आत्मक्रीड’, ‘आत्मरति’ ही नावे दिली आहेत आणि त्यांनाच परमानंदाचा लाभ झालेला असतो, त्यांचेच जीवन खर्या अर्थाने सफल झालेले असते, असे सांगितले आहे. या जीवनसाफल्यासाठी आत्मविद्येबरोबर एकाग्रमन, सत्यनिष्ठा, ब्रह्मचर्य, शुद्ध चारित्र्य आणि सतत प्रयत्न यांची अत्यंत आवश्यकता असून साधक जर या साधनांचा अवलंब करील तर त्याला शेवटी आत्मज्ञानाचे लक्ष्य निश्चितपणे प्राप्त होईल आणि तो सर्व दु:खांतून व दुरितांतून मुक्त होईल. अंगिरसांच्या उपदेशाचे हेच सार आहे. मानवी जीवन उन्नत व कृतार्थ करणार्या या उपनिषदापासून वाचकांना नवीन प्रेरणा लाभेल.