Rs.25.00
Author
Swami Akhandananda Pages
132 Translator
Sri Narendranath Patil Choose Quantity
Product Details
स्वामी अखंडानंदजी हे भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंग संन्यासी शिष्य असून,पूज्यपाद स्वामी विवेकानंदांचे विशेष आवडते गुरुबंधू होते. ‘रामकृष्ण-संघ’ आज जीवनाच्या नाना क्षेत्रांत आणि विशेषतः रोग-दुष्काळ-पूर इत्यादींनी पीडिलेल्यांची जी सेवा करीत आहे, तिची मुहुर्तमेढ पूजनीय स्वामी अखंडानंदजींनी असीम स्वार्थत्यागपूर्वक मुर्शिदाबाद विभागात दृष्काळ-पीडितांची सेवा करण्यास सुरुवात करूनच रोविली आहे. त्यांची गभीर आध्यात्मिकता, सुविशाल हृदय आणि बालकासारखा सरल, निरागस स्वभाव यांमुळे ते सर्वांनाच हवेहवेसे वाटत. वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षीच ते भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणांजवळ उपस्थित झाले होते. स्वामी अखंडानंदजी ‘रामकृष्ण-संघा’चे तिसरे अध्यक्ष होते.
स्वामी अखंडानंदजींनी जनसेवेचे व्रत घेण्यापूर्वी कित्येक वर्षे जन-कोलाहलाचा त्याग करून हिमालयात आणि तिबेटच्या परिसरात खडतर तपश्चर्येत घालविली होती. इ.स. १८८७ साली ते प्रथम तिबेटला गेले. त्या वेळी त्यांचे वय सुमारे सतरा असेल.स्वामीजींच्या तोंडून त्यांची भ्रमणकहाणी जे ऐकत ते मुग्ध होऊन जात.