Rs.6.00
Author
Swami Vivekananda Pages
52 Translator
Sri G S Waze Product Details
पॅसॅडेना (कॅलिफोर्निया) येथील ‘शेक्सपिअर क्लब’मध्ये दि. 27 जानेवारी 1900 रोजी स्वामी विवेकानंदांनी जे सुप्रसिद्ध इंग्रजी व्याख्यान (‘My Life and Mission’) दिले होते त्याचा मराठी अनुवाद प्रस्तुत पुस्तकाच्या रूपाने वाचकांच्या हाती देण्यात येत आहे. या व्याख्यानात आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचे दर्शन तर होतेच, पण त्याबरोबरच त्यांचे विशाल हृदय अनेक प्रकारची दु:खे भोगणार्या आपल्या लाखो-करोडो बांधवांच्या उन्नतीसाठी कसे तिळतिळ तुटत होते आणि आपल्या प्रिय मातृभूमीला तिचे पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी कोणती योजना आखली होती याचे स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभे राहते. स्वत:च्या जीवनाविषयी, हृदयातील प्रचंड खळबळीविषयी आणि त्यामुळे होणार्या तीव्र वेदनांविषयी इतक्या स्पष्ट व परिणामकारक शब्दांत जाहीर रीतीने लोकांसमोर बोलण्याचा स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील फक्त हाच एक प्रसंग होता, आणि म्हणूनच त्यांच्या या व्याख्यानाचे आज विशेष महत्त्व आहे.