Rs.15.00
Author
Swami Japananda Pages
74 Choose Quantity
Product Details
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक स्वामी जपानंद हे रामकृष्ण संघाचे एक वरिष्ठ संन्यासी होते. त्यांचा जन्म 5 मे 1898 मधे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हुगळी जिल्ह्यातील चंदननगर येथे झाला होता. 1912 पासून त्यांनी बेलुर मठामधे येणे-जाणे सुरू केले. 1916 मधे ते गृहत्याग करून मठामधे सम्मिलित झाले, त्यांना स्वामी ब्रह्मानंद, स्वामी प्रेमानंद, स्वामी शिवानंद आणि स्वामी सुबोधानंद यांचा विशेष संग व प्रेम प्राप्त झाले होते. 22 ऑगस्ट 1918 या दिवशी त्यांना माताजी श्रीसारदादेवींकडून मंत्रदीक्षा व स्वामी ब्रह्मानंदजींकडून 1920 मधे संन्यासदीक्षा प्राप्त झाली होती. ते ढाका आणि राजकोट या आश्रमांमधे काही काळ मठाध्यक्ष म्हणून होते. कित्येक दुष्काळग्रस्तांच्या सेवाकार्यांचे त्यांनी संचालन केले होते. 1936 मधे ‘श्रीरामकृष्ण-जन्मशताब्दी’ आणि 1953 मधे ‘श्रीसारदादेवी-जन्मशताब्दी’ निमित्त त्यांच्यावर प्रचारकार्य सोपविण्यात आले होते. ते त्यांनी सफलतापूर्वक संपन्न केले. 26 फेब्रुवारी 1972 साली ते ब्रह्मलीन झाले.