Rs.8.00
Author
Swami Bhuteshananda Pages
43 Translator
Dr. D D Punde Choose Quantity
Product Details
आध्यात्मिक साधकाला हाताला धरून शिकविण्यासाठी आणि अध्यात्माच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. ते मंत्र नामक गुणसूत्र सांगतात. त्या मंत्राचा जप करून साधक आपला मार्ग शोधू शकतो आणि आपलं परमोच्च ध्येय गाठू शकतो. आध्यात्मिक जीवनातील हा दीक्षाविधी मंत्रदीक्षा म्हणून ओळखला जातो. मंत्रदीक्षा ही गंभीर महत्त्व असलेली एक विधियुक्त पायरी आहे. ज्याप्रमाणे शेतीमध्ये बी-बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी जमिनीची सर्वांगीण मशागत करावी लागते, त्याप्रमाणे मंत्रदीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने मंत्र घेण्यापूर्वी अनेक प्रकारे स्वतःची आत्मशुद्धी करून घ्यायची असते. या सर्व गोष्टी या पुस्तिकेमध्ये रामकृष्ण संघाचे बारावे अध्यक्ष श्रीमत् स्वामी भूतेशानंदजी महाराज यांनी अतिशय सोप्या पद्धतीने समजावून दिलेल्या आहेत. ते थोर विचारवंत, प्रसन्न संभाषण करणारे व सभोवतालच्या लोकांवर तळमळीने प्रेम करणारे होते. या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते एक महान आध्यात्मिक व्यक्तित्व होते. जे कोणी त्यांच्या सहवासात येत त्या सर्व लोकांचे भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण होण्यात त्यांना खरा आनंद वाटे. प्रथम रामकृष्ण संघाचे उपाध्यक्ष म्हणून आणि नंतर अध्यक्ष म्हणून हजारो भक्तांना मंत्रदीक्षा देण्याचा अधिकार त्यांना लाभलेला होता आणि त्यात त्यांना आनंदही वाटत असे. अशा वेळी ते केवळ ध्यानधारणेतील प्रत्येक पायरी तपशिलाने स्पष्ट करून थांबत नसत तर आध्यात्मिक जीवनातील बारकावेही स्पष्ट करीत. दीक्षार्थींसमोर त्यांनी केलेली प्रवचने केवळ माहितीपर नसत तर प्रेरणादायकही असत. ही पुस्तिका म्हणजे अशाच तीन प्रवचन-लेखांतील सुयोग्य मजकुराचे एकत्रीकरण आहे – प्रस्तुत पुस्तिकेमध्ये वाचनसुलभतेसाठी उपशीर्षके दिलेली आहेत. प्रस्तुत पुस्तिकेच्या वाचनाने आध्यात्मिक जीवनाची ओढ असणाऱ्या व मंत्रदीक्षा प्राप्त करू इच्छिणाऱ्या वाचकांना अभ्युदय आणि निःश्रेयस प्राप्त होण्यास मदत"