Product Details
आजच्या गतिमान युगात स्वामी विवेकानंदांचे विचार हे मूळ वाङ्मयातून अभ्यासणे अनेकांना कठीण जाते. मग इच्छा असूनही योग्य प्रसंगी हे विचार उपलब्ध करून घेणे अनेकदा जमत नाही. त्याचसाठी स्वामीजींच्या विचारांचे विषयवार वर्गीकरण येथे करण्यात आले आहे. एका अर्थाने हा संग्रह म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या उदात्त, ओजस्वी विचारांचा ‘संदर्भ-कोश’ म्हणूनही महत्त्वाचा ठरू शकतो. एखाद्याला स्वामीजींचे उदात्त तत्त्वज्ञान थोडक्यात जाणून घ्यायचे असल्यास, त्यासाठी देखील या पुस्तकाला प्रातिनिधिक म्हणून मानता येईल.