Rs.10.00
Author
Swami Shivatattwananda Pages
31 Product Details
उपनिषदे हीच भारतातील अध्यात्मज्ञानाचे उगमस्थान होत. मानवी जीवनातील व जगातील अंतिम सत्यांविषयीचा आपला प्रत्यक्षानुभव द्रष्ट्या ऋषींनी विविध पैलूंमधून या उपनिषदांमधे प्रकट केला आहे. ईश उपनिषद हे त्यांपैकी एक छोटे परंतु महत्त्वाचे उपनिषद आहे. मानवी जीवनाच्या अपूर्णतेची प्रत्येक विचारी माणसाला कमीअधिक जाणीव असते. ते आहे त्याहून चांगले, दु:खविरहित सुखाचे, अज्ञानरहित प्रकाशाचे असावे असे त्याला वाटत असते. परंतु, अशा दिव्य जीवनाचे खरे स्वरूप काय हे माहीत नसल्यामुळे त्याला त्याची वाट सापडत नाही, जगातील फसव्या सुखांनी चकून तो त्याच अंधारात घुटमळत जगत असतो. मानवजीवनाचे अंतिम लक्ष्य असलेल्या ह्या खर्या दिव्य जीवनाचे स्वरूप काय आहे व ते प्राप्त करून घेण्याचा खरा मार्ग कोणता हे ईश उपनिषदात दाखवून देण्यात आले आहे. ईश उपनिषदातील हे सत्यदर्शन आधुनिक मानवाला समजेल-पटेल अशा सुबोध पद्धतीने प्रस्तुत पुस्तकात विवरून सांगितले आहे.