Product Details
भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंग लीलासहचर श्रीमत् स्वामी शिवानंद महाराज (महापुरुष महाराज) यांनी संभाषणाच्या ओघात वेळोवेळी निरनिराळ्या भक्त-साधकांना जे अमृतमय उपदेश दिले ते काही संन्यासी व गृही साधकांनी आपल्या रोजनिशीत लिहून ठेवले होते. महाराजांच्या महासमाधीनंतर त्या उपदेशांचे संकलन बंगाली भाषेत ‘शिवानंद-वाणी’ या नावाने दोन भागांत प्रसिद्ध झाले. प्रस्तुत पुस्तक मूळ बंगाली ग्रंथाचा अनुवाद आहे. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत महापुरुषजींकडे लोकांची रीघ लागलेली असे. त्यांना औपचारिकपणा मुळीच मानवत नसे. त्यामुळे आलेल्या जिज्ञासूंनाही अगदी मोकळेपणाने आपल्या अंत:करणातील वेदना त्यांना उघड करून दाखविताना संकोच वाटत नसे. महापुरुषजींच्या उपदेशांतून त्यांना स्वत: विचारलेल्या प्रश्नांची, थेट हृदयाचा ठाव घेणारी उत्तरे तर मिळत असतच पण याशिवाय कित्येकदा बर्याच काळापासून मनात निर्माण होणारे पण निश्चित प्रश्नार्थक स्वरूपापर्यंत न पोहोचलेले कितीतरी संशय अभावितपणे उकलले जात असत. या दुर्लभ वैशिष्ट्यामुळे ही संभाषणे, जीवनाच्या सार्या समस्यांवर मात करून शाश्वत आनंदाची प्राप्ती करून घेण्याची आकांक्षा असणार्या साधकांच्यापक्षी अमोघ मार्गदर्शक ठरली आहेत. श्रीरामकृष्ण, श्रीमाताजी, स्वामी विवेकानंद तसेच त्यांचे इतर गुरुबंधू यांच्यासंबंधी बरीच मौलिक माहितीही या संभाषणांतून प्रकट झाली आहे.