

Product Details
‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च’ अर्थात स्वतःचा मोक्ष आणि जगताचे कल्याण – हे ध्येयवाक्य समोर ठेवून कर्म कसे करावे याचे मार्गदर्शन स्वामी विवेकानंदांनी आपल्या प्रवचनांतून समाजासमोर ठेवले आहे. तरुण मुलामुलींमध्ये जी ऊर्जा वाहत असते तिला योग्य ते वळण देऊन ती सत्कार्यामधे कशी लावता येईल याचे विवेचन येथे करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंदांचे ‘कर्मयोग’ नामक जे पुस्तक आहे त्याचीच जणुकाही ही संक्षिप्त आवृत्ती होय. युवकांनी हे ‘कर्म’विषयक विचार नीटपणे समजावून घेऊन ते त्यांनी अंगी बाणवून घ्यावेत व आपली जीवने उजळून घ्यावीत. शिवाय निष्क्रिय करणाऱ्या तमोगुणाचा नाश करून त्यांनी आपले जीवन ध्येयाभिमूख करावे यासाठी आम्ही अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो.