Product Details
स्वामी विवेकानंदांच्या दैवी व्यक्तिमत्त्वाने आणि त्यांच्या उदात्त वाणीने असंख्य लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणून त्यांना नवीन दृष्टी दिली आहे. त्यांची अमानवी प्रतिभा त्यांच्या ओजस्वी वाणीत पूर्णपणे प्रकट झाली आहे, आणि म्हणूनच त्यांचे ग्रंथ वाचत असताना आपण एका निराळ्याच दिव्य वातावरणात वावरत आहोत असा आपल्याला अनुभव येतो. त्यांनी विविध विषयांवर वेळोवेळी प्रकट केलेल्या स्फूर्तिदायक आणि शक्तिशाली अशा निवडक विचारांचे संकलन प्रस्तुत पुस्तकात केले आहे. वैयक्तिक उन्नतीच्या दृष्टीने, तसेच राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या दृष्टीने या विचारांचा सर्वांनाच खात्रीने उपयोग होईल. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत प्रत्यक्ष कार्य करणार्या व्यक्तींना तर स्वामी विवेकानंदांचे हे विचार विशेष लाभदायक वाटतील.