Rs.15.00
Author
Swami Vivekananda Pages
44 Translator
L K Aarawkar Product Details
प्रस्तुत पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी भारताच्या प्राचीन इतिहासाचे व पुरातन कालापासून आधुनिक कालापर्यंत भारतात प्रचलित असलेल्या विभिन्न प्रकारच्या शासनपद्धतींचे चित्र रेखाटले असून भारताची अवनती ज्या कारणांमुळे झाली त्या कारणांचेही दिग्दर्शन केले आहे. तसेच, भारताची राष्ट्रीय ध्येये कोणती आहेत व त्यांच्यावर भर दिल्याने आणि ती कृतीत आणल्याने भारतभूमीचे पुनरुत्थान कसे होऊ शकते याचेही स्वामीजींनी प्रस्तुत पुस्तकात आकर्षक पद्धतीने वर्णन केले आहे. पाश्चात्त्यांपासून इष्ट ते घेऊन, परंतु त्यांचे अंधानुकरण न करता भारतीय आदर्शानुसार जेव्हा ‘खरी माणसे’ निर्माण होतील तेव्हाच भारताचा खराखुरा विकास होईल व भारत प्रगतिपथावर अधिकाधिक पुढे जाईल या सत्याचे स्वामीजींनी प्रस्तुत पुस्तकात मूलग्राही विवेचन केले असून त्यावरून वाचकांना त्यांच्या दूरदृष्टीचा व अलौकिक प्रतिभेचा प्रत्यय येईल. आधुनिक भारताची सर्वांगीण उन्नती घडवून आणण्यासाठी प्रस्तुत पुस्तकातील स्वामीजींचे प्रभावी विचार निश्चितच लाभदायक ठरतील.